SSC-HSC Exam | शिक्षण विभागाच्या अस्पष्ट सूचना; दहावी-बारावीचे वर्ग ऑनलाइन की ऑफलाइन वरून शाळा व्यवस्थापन संभ्रमात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SSC-HSC Exam | कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढू लागल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये (Schools And Colleges) 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम आणि अध्यापनाव्यतिरिक्तचे प्रशासकीय कामकाज याला सूट राहणार आहे. पण दहावी आणि बारावीचे वर्ग भरवायचे की नाही? की ऑनलाइन (Online) घ्यायचे याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना (SSC-HSC Exam) नसल्याने शिक्षकांसह (Teachers) विद्यार्थ्यांमध्ये (Students) संभ्रम निर्माण झाला आहे. वास्तविक निर्बंध लागू केल्यानंतर शिक्षण विभागाने सविस्तर सूचना देने अपेक्षित होते पण तसे काही झाले नाही. त्यामुळे परीक्षा तोंडावर आली असताना वर्ग प्रत्यक्षात भरवायचे की नाहीत ? हा प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.

 

दहावीची लेखी परीक्षा ही 15 मार्च ते 18 एप्रिल, तर बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान होणार आहे.
तसे वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) जाहीर केले आहे.
लेखी परीक्षेपूर्वी त्यांची तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे.
15 फेब्रुवारी पर्यंत जर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले तर त्यांच्या पूर्वपरीक्षा कधी घेणार? विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षांसाठीचा सराव कधी होणार? असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षक विचारत आहेत.
दरम्यान काही पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थी दहावी-बारावीच्या परीक्षांना (10 th-12 th Exams) सरावाविना सामोरे गेल्यास त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे.
या मुलांचे लसीकरण सुरू आहे.
त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी-पालक करू लागले आहेत. (SSC-HSC Exam)

शिक्षकांची वर्क फ्रॉम होमची मागणी –
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे (Shivnath Darade) म्हणाले की, ‘शाळेत एखादा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी, शिक्षक आजारी आहे किंवा कोरोनाची लागण झाली असेल तर ती शाळा बंद करून दहावी, बारावीचे वर्ग ऑनलाइन ठेवावेत तसेच शिक्षकांना आठवडाभर वर्क फ्रॉम होम (Work From Home) करू द्यावे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

Web Title :-  SSC-HSC Exam | ssc and hsc exam online or offline teacher headmaster confusion in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supreme Court Lawyers | दहशतवादी संघटना SFJ ची SC च्या 35 वकीलांना धमकी, म्हटले – ‘PM मोदींना मदत करू नका’

 

Multibagger Stock | 3 महिन्यात 300% वाढला ‘या’ बासमती तांदळाच्या कंपनीचा स्टॉक, तुम्ही खरेदी केला आहे का?

 

PM Kisan | खुशखबर ! ज्या शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये आतापर्यंत आले नाहीत पैसे, ‘या’ तारखेला होतील जमा, जाणून घ्या तारीख