SSC, HSC Exam Time Table | 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SSC, HSC Exam Time Table | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 10 वी (SSC Exam) आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक (SSC, HSC Exam Time Table) जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विटद्वारे दिली. कोरोनाच्या महामारीत दहावी आणि बारावी परीक्षा देता आल्या नाहीत. आता मात्र परीक्षा मंडळाकडून सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.

 

यानूसार बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या (SSC, HSC Exam Time Table) तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तसेच 10 वी बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं जारी करण्यात आलं होतं. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केलं आहे.

 

 

 

दरम्यान, 12 वीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.
इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी,
अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022
या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील.
तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असणार आहे.
प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

Web Title :- SSC, HSC Exam Time Table | SSC HSC exam 2022 this is the schedule of 12th standard examination in maharashtra education minister Varsha Gaikwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा