SSC, HSC Result 2022 | इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या निकालाच्या तारखा जाहीर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC, HSC Result 2022 | नुकतंच दहावी आणि बारावीचा निकाल जूनमध्येच लागणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) स्पष्ट करण्यात आलं होतं. यानुसार आता दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर, बारावीचा निकाल 10 जून रोजी लागणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th Exams) संपल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल (SSC, HSC Result 2022) लवकरच लागणार असून या परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे 10 वीचा निकाल 20 जूनपर्यंत तर, 12 वीचा 10 जूनला लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- ssc hsc result 2022 class 10 12 board results will be declaired on 20 and 10 june

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा