SSC-HSC Supplementary Exam-2023 | 10 वी-12 वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SSC-HSC Supplementary Exam-2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) 10 वी आणि 12 वीच्या जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक (SSC-HSC Supplementary Exam-2023) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दि. 18 जुलै 2023 रोजी पासून परीक्षा सुरू होणार आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक (Secretary Anuradha Oak) यांनी दिली.

 

पुणे (Pune), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), अमरावती (Amravati), नाशिक (Nashik), लातूर (Latur) व कोकण (Konkan) या 9 विभागीय मंडळामार्फत लेखी पुरवणी परीक्षा (SSC-HSC Supplementary Exam-2023) घेण्यात येणार आहे. बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयांची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तसेच व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत होईल. त्याचबरोबर दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट यादरम्यान होईल. 10 वी ची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही 18 जुलैपासून सुरू होणार आहे.

 

बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान होईल.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा,
उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

Advt.

विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखा तपासून परीक्षेला हजर राहावे. इतर संकेतस्थळांवर किंवा अन्य यंत्रणांवर तसेच
व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमांवर छापलेले वेळापत्रक स्वीकारू नये, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

 

 

Web Title : SSC-HSC Supplementary Exam-2023 | maharashtra board released ssc hsc supplementary exam 2023 time table

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा