SSC JHT 2019 : हिंदी अनुवादक पदासाठी भरती, 1,12,400 पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कनिष्ठ हिंदी अनुवादक, ज्येष्ठ हिंदी अनुवादक आणि हिंदी प्राध्यापक या पदांसाठी परीक्षा (SSC JHT 2019) अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू झाली असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर आहे.

जाणून घेऊयात याबद्दल अधिक :

परीक्षेचे नाव : ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा 2019

एकूण पदे : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव
१. ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS)
२. ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board)
३. ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ)
४. ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
५. सिनिअर हिंदी ट्रांसलेटर
६. हिंदी प्राध्यापक

ग्रेड पे स्केल :

पद क्र. १ ते ४ : लेव्हल ६ ( ₹ ३५,४०० – १,१२,४००)
पद क्र.५ : लेव्हल ७ (₹ ४४,९०० – १,४२,४००)
पद क्र.६ : लेव्हल ८ (₹ ४७६०० – १,५१,१००)

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. १ ते ४: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.५ : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
पद क्र.६ : (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी (ii) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट :
०१ जानेवारी २०२० रोजी १८ ते ३० वर्षे हवे. (SC/ST:०५ वर्षे सूट, OBC:०३ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत.

परीक्षा शुल्क :
General/OBC: १०० रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही)

महत्त्वाच्या तारखा :

परीक्षा (CBT पेपर I) : २६ नोव्हेंबर २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०१९ (संध्याकाळी ५ पर्यंत)
पेपर २ ची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.

अधिक माहिती SSC ची अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर उपलब्ध आहे.

आरोग्यविषयक वृत्त –