12 वी पास उमेदवारांना ‘सरकारी’ नोकरीची ‘संधी’ ! ‘SSC’ राबवणार ‘या’ पदांसाठी ‘भरती’ प्रकिया, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC ने स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी साठीच्या विविध जांगासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया आज पासून सुरु होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. यासंबंधित अधिक माहिती उमेदवार SSC च्या  ssc.nic.in या आधिकृत वेबसाइटवरुन देखील मिळवू शकतात.
 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर असणार आहे. परंतू आयोगाने अजून हे स्पष्ट केले नाही की या पदांसाठी किती जागा रिक्त आहेत. यासंबंधित माहिती आयोग लवकरच आपल्या आधिकृत वेबसाइटवर देईल. आयोगाकडून अनेक सरकारी विभागात, मंत्रालयात आणि संस्थामध्ये रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येते. 
 
शैक्षणिक पात्रता –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त संस्थेतून 12 वी पास असणे आवश्यक आहे. 
 
वयोमर्यादा –
स्टेनोग्राफर ग्रेड सी च्या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय 18 आणि अधिक वय 30 वर्षापर्यंत असावे. तर ग्रेड डीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 ते अधिक 27 वर्ष असणे आवश्यक आहे. 
 
परिक्षा आराखडा –
दोन्ही पदांसाठी कंप्युटर आधारित परिक्षा असेल. ज्यात मल्टिपल च्वॉइस प्रश्न विचारण्यात येतील. प्रश्नपत्रिकेत तीन भाग असतील. जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज व कॉम्प्रिहेंशन. या परिक्षेसाठी उमेदवारांना दोन तास देण्यात येतील. 
 
SSC निवड प्रक्रिया –
उमेदवारांना कंप्युटर आधारित परिक्षा द्यावी लागेल, ज्यानंतर एक स्किल टेस्ट होईल. 
 
अर्ज प्रक्रिया –
उमेदवारांना परिक्षा शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. उमेदवार नेट बँकिंगच्या आधारे आणि डेबिट कार्डच्या आधारे परिक्षा शुल्क भरु शकतील. 

visit: Policenama.com