SSC Recruitment 2020 : दिल्ली पोलिस आणि CAPF मध्ये मेगा भरती, 112400 रुपयांपर्यंत मिळणार पगार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मोठ्या संख्येने भरती काढली आहे. या भरतीअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) आणि दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षकांच्या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. अधिकृत अधिसूचनेनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवार SSC CAPF SI Recruitment 2020 च्या भरतीसाठी 16 जुलै 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. एसएससीने काढलेल्या या भरती अंतर्गत एकूण 1564 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागितले आहेत. तसेच, या पदांच्या वाढण्याबाबतही बोलले जात आहे. सध्या 1564 पदांवरील भरतीसाठी उमेदवार ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, या भरतीची प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होणार होती, परंतु कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मुदत वाढवावी लागली. या भरतीअंतर्गत दिल्ली पोलिसात एसआय पदासाठी 169 पदे ठेवण्यात आली आहेत, त्यापैकी 91 पुरुष आणि 78 पदे महिलांसाठी आहेत. त्याचबरोबर सीएपीएफमध्ये एकूण 1395 पदे ठेवण्यात आली असून त्यापैकी 1342 पदे पुरुषांसाठी आहेत तर 53 पदे महिलांसाठी आहेत. महत्वाचे म्हणेज या भरती अंतर्गत निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना मॅट्रिक्स लेव्हल 6 च्या आधारे पगार दिले जातील. त्यानुसार उमेदवारांना महिन्याला 35400 ते 112400 रुपये पगार मिळेल.

भरतीसाठी वयोमर्यादा 20 वर्षे ते 25 वर्षे आहे. वयमोजणी 01.01.2021 च्या आधारावर केली जाईल. एसएससीने काढलेल्या बंपर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्काबद्दल सांगायचे झाल्यास जनरल / ओबीसी / ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एससी / एसटी / महिला / माजी सैनिकांसाठी अर्ज फी नाही.

दिल्ली पोलिस भरतीतील महत्त्वाच्या तारखा (सीपीओ एसआय एसएससी 2020 परीक्षेच्या तारखा)

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया प्रारंभ – 17 जून 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 जुलै 2020

ऑनलाईन अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख – 18 जुलै 2020

चलन वरून अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2020

संगणक आधारित परीक्षेची तारीख (पेपर- I) – 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020 दरम्यान

उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा व शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल.