म्हणून १० वीच्या निकालाचा टक्‍का यंदा घसरला ; जाणून घ्या कशामुळे घसरला टक्‍का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आज जाहीर झाला. दहावीच्या निकालाचा टक्का गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल १२.३१ टक्क्यांनी घसरला आहे. याविषयी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने दहावीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत असे विनोद तावडे म्हणाले आहेत.

विनोद तावडे म्हणाले आहेत की,’ २००७ पर्यंत तोंडी परीक्षा नव्हती. त्यावेळी निकाल हा एवढाच लागायचा. मात्र २००८ ते २०१८ या काळात तोंडी परीक्षा आणि त्याचे गुण शाळेकडून मिळायचे. त्यामुळे दहावीचा टक्का हा एकदम १६ टक्यांनी वाढला होता. आज दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी कमी झाला. त्यामुळे अनेक पालक, शिक्षण तज्ज्ञ बोलतंय आता प्रवेशाचे काय, असा प्रश्न पडला आहे. आता हे तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळे त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल. याआधी १० वी ला चांगले गुण मिळाले की ११ वी ला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करण्याकडे कल असायचा. यामुळे बेरोजगरीमध्ये भर पडायची. पण आता असा होणार नाही, विद्यार्थ्यांना आता खरे गुण मिळाल्याने त्यांना योग्य ठिकाणी दिशा कळेल.’

दहावीचा अभ्यासक्रम २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आला. या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा हा पहिला निकाल जाहीर झाला आहे. राज्यात परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७७. १० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण होण्यात मुलींची टक्केवारी अधिक आहे. कोकण विभागाचा ८८. ३८टक्के असा सर्वाधिक निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल ६७.२८ टक्के असा नागपुर विभागाचा निकाल आहे.