SSC Result 2021 | दहावीच्या निकालाची वेबसाइट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result 2021) आज (शुक्रवार) दुपारी 1 वाजता ऑनलाईन (Online) पद्धतीने घोषीत केले होते. परंतु, दुपारी 2 वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना आपला निकालच (SSC Result 2021) पाहताच आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिली. परिणामी वेबसाईट क्रॅश (website crash) झाली आहे.

SSC Result 2021 | x results website crash difficulties in seeing results for students and parents

दरम्यान, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने यंदा नकालासाठी result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक बोर्डाने दिली आहे. यासोबतच बोर्डाची नेहमीची अधिकृत लिंक www.mahahsscsscboard.in येथेही निकाल पाहता येईल, असे बोर्डाने गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले होते. मात्र, दुपारी 2 नंतर या दोन्ही लिंकवर जाऊन निकाल पाहण्यासाठी प्रयत्न केले असता साईट डाऊन असल्याने विद्यार्थी, पालक त्रस्त झाले. यासंदर्भातील तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून केल्या जात आहेत.

एकाच वेळी अनेक विद्यार्थी साईटवर

एमकेसीएल (MKCL) सह इतर संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करुन दिले जातात.
त्याचप्रमाणे मोबाईलवर एसएमएसच्या (SMS) माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना
दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यातील 16
लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिल्याने त्यावर ताण आला.

दहावीचा यंदाचा निकाल 99.95 %

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत
मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यात 9 विभागीय मंडळाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. सर्वात जास्त
निकाल 100 टक्के कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी निकाल 99.84 टक्के नागपूर
विभागाचा आहे.

पुणे विभागाचा निकाल 99.96 %

राज्यातील नऊ विभागांचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. यापैकी कोकण विभागाचा 100
टक्के, अमरावती 99.98 टक्के, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि लातूर विभागाचा निकाल
99.96 टक्के लागला आहे. तर कोल्हापूर विभागाचा 99.92 टक्के तर सर्वात कमी 99.84 टक्के
निकाल नागपूर विभागाचा लागला आहे.

हे देखील वाचा

PM Kisan Scheme | सरकारने 11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पाठवले 1.35 लाख कोटी रुपये, पुढील हप्त्यासाठी ‘या’ पध्दतीनं करा रजिस्ट्रेशन

Anil Deshmukh | ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाखाची मालमत्ता जप्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  SSC Result 2021 | x results website crash difficulties in seeing results for students and parents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update