१०० % कन्फर्म ! १० वीचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली आहे. दहावीच्या निकालावरून सोशल मीडियावर अनेक तराखा सांगितल्या जाऊ लागल्या. त्यामुळे दहावीचा निकाल अखेर कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ८ जून रोजी लागणार असल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे निकालावरून होत असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ८ जूनला दुपारी १ वाजता लावणार असल्याचे विभागीय मंडळाच्या सचिवांनी निवेदनाद्वारे कळविले.

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता maharesult.nic.in या बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर पाहता येईल.

Loading...
You might also like