दहावीतील भाषा विषयासाठीचे २० गुण बंद, शिक्षण मंडळाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- दहावीच्या भाषा विषयांचे आत्तापर्यंत देण्यात येणारे अंतर्गत २० गुण देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे दहावीच्या भाषा विषयाची लेखी परीक्षा आता १०० गुणांची असणार आहे. २० गुण रद्द केल्याने दहावीतील विद्यार्थ्यांना यापुढे १०० गुणांचा पेपर लिहावा लागणार आहे. या निर्णयाने सहजपणे मिळणारे २० गुण यापुढे विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत.

राज्यात असलेल्या दहावी आणि बारावीच्या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांमध्ये ज्यात सीबीएससी, आयसीस, आयबी आदींमध्ये हे गुण दिले जातात. त्याच धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांनाही हे गुण दिले जात होते. केंद्रीय मंडळातील विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण जवळपास १००  पैकी ४० पर्यंत दिले जातात. तर, राज्य शिक्षण मंडळाकडून आत्तापर्यंत केवळ २० गुण दिले जात होते, हे गुण आता बंद करण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाकडून विद्याथ्र्यांना देण्यात येणारे अंतर्गत गुण कमी केल्या त्याचा मोठा परिणाम हा येत्या शैक्षणिक वर्षामध्ये दिसणार आहे.

धोका पत्करत क्रूझवर सेल्फी काढणाऱ्या अमृता फडणवीस यांच्यावर टीका

अशी भीती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली आहे. असे झाल्यास सर्व नामांकित महाविद्यालयांमध्ये राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना गूणवत्ता असुनही प्रवेश मिळणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्य शिक्षण मंडळाकडून  हा प्रकार जाणून बुजून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राज्य मंडळाने व शिक्षण विभागाने याबाबत योग्य तो विचार करावा व त्यानुसार कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटले.