ड्रग्ज कनेक्शन : NCB च्या रडारवर 50 सेलेब्स, प्रोड्यूसर-डायरेक्टरच्या नावांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुशांत सिंह राजपूत सुसाइड प्रकरणात जेव्हापासून ड्रग्जचे कनेक्शन पुढे आले आहे, देशभरातील फॅन्स आणि बॉलीवुडची झोप उडाली आहे. बॉलीवुडच्या पार्ट्यांमध्ये होणार्‍या ड्रग्जच्या वापराबाबत खुलासे झाले तर अ‍ॅक्टर्सची नावे समोर येणे सहाजिकच होते. सुशांत केसशी संबंधित लोक, रिया चक्रवर्ती, ड्रग पॅडलर्स इत्यादींनी बॉलीवुडच्या अनेक नावांचा खुलासा केला आहे. नुकत्याच एनसीबीने दोन एफआयआर दाखल केल्या होत्या, ज्यावर वेगाने काम सुरू आहे. एनसीबीच्या रडारवर सध्या 50 बॉलीवुड सेलेब्स आहेत.

या आहेत एनसीबीच्या दोन एफआयआर
केसमध्ये सुशांत सिंह राजपूत आणि ड्रग प्रकरणात दीपिका पदुकोण, सिमोन खंबाटा आणि राकुल प्रीत सिंहची चौकशी केली जाईल. या सर्वांची नावे जया साहाने सांगितली होती. जयानेच दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचे नाव सांगितले होते.

sara-ali-khan

केसमध्ये श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचा सहभाग आहे. या दोघींना घरी जाऊन एनसीबीने समन्स दिले होते. दोघींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी होईल. या दोघींची नावे रिया चक्रवर्ती आणि काही ड्रग पॅडलर्सकडून समजली आहेत.

Shraddha-Kapoor

सांगितले जात आहे की, दीपिका पदुकोण, सिमोन आणि राकुल प्रीतची एनसीबीच्या मुंबईतील कुलाबा येथील गेस्ट हाऊसमध्ये चौकशी केली जाईल. तर सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एनसीबीच्या झोनल ऑफिसमध्ये चौकशी होईल. एनसीबी यासोबतच बॉलीवुडच्या पार्ट्यांचीही चौकशी करणार आहे. त्यांच्या रडारवर 50 अ‍ॅक्टर्स, अ‍ॅक्ट्रेस, प्रोड्यूसर आणि डायरेक्टर आहेत, जे ड्रग पार्टी आयोजित करत होते.

रकुल प्रीत देत नाही एनसीबीला उत्तर
सुशांत केसमध्ये समोर आलेल्या ड्रग्ज अँगलमध्ये अ‍ॅक्ट्रेस रकुल प्रीत सिंहचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीने रकुलला समन्स पाठवले होते. परंतु, रकुल प्रीत सिंहने एनसीबीचे समन्स मिळाले नसल्याचे सांगितले. एनसीबी सूत्रांचे म्हणणे आहे की, रकुल खोटं बोलत आहे. रकुलशी संपर्क साधण्याचा एनसीबी अधिकार्‍यांनी अनेकदा प्रयत्न केला. रकुलने एनसीबीच्या फोनला रिस्पॉन्स दिला नाही.

Rakul Preet Singh

एनसीबीकडून औपचारिक उत्तर देण्यात आले आहे की, रकुल प्रीत सिंहला ड्रग्ज प्रकरणात समन्स देण्यात आले होते. परंतु, रकुल उपलब्ध होत नाही आणि कोणतेही उत्तर एजन्सीला देण्यास टाळाटाळ करत आहे. एनसीबीचे अधिकारी केपीएस मल्होत्रा यांचे म्हणणे आहे की, राकुल प्रीत सिंहला समन्स देण्यात आले होते आणि तिला अनेक प्लॅटफॉर्म्सवर कॉन्टॅक्ट करण्यात आला. परंतु, तिच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. रकुल फोन उचलत नाही. माहितीनुसार रकुल सध्या हैद्राबादमध्ये आहे.