सुशांतची Ex मॅनेजर दिशा सालियाननं शेवटचा कॉल 100 नंबरवर केला होता का ? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मृत्यूआधी दिशानं 100 नंबरवर कॉल केल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु तिनं हा कॉल केलाच नव्हता. त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या मैत्रिणीसोबत बोलत असल्याचं तपासात समोर आलं आहे.

मृत्यूच्या काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर म्हणजेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षेत फोन करण्यात आला होता अशी माहिती होती. परंतु दिशानं हा कॉल केलाच नाही असं समजत आहे. एका भाजप नेत्यानं असा खुलासा केला होता की, दिशानं पोलिसांना फोन केल्यानंतर सुशांतलाही फोन केला होता. दिशानं सुशांत आणि पोलिसांना सांगितलं होतं की, तिच्यासोबत काही चुकीचं घडलं आहे आणि तिचा जीव धोक्यात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. दिशाच्या आई वडिलांशी यासंदर्भात बातचित केली असता ही फक्त एक कहानी आहे असं काहीही घडलं नाही असं समोर आलं आहे.

तपासात असं समोर आलं आहे की, 1 जून ते 8 जून या कालावधीत दिशाच्या मोबाईलवरून मुंबई पोलिसांना कोणताही फोन आला नाही. तसंच तिनं सुशांतलाही फोन केला नाही. तर त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या मैत्रिणीसोबत बोलत होती.

मृत्यूच्या 1 महिनाआधी केला होता 100 वर कॉल
मृत्यूच्या जवळपास एक महिना आधी 10 मे रोजी दिशाच्या मोबाईलवरून 100 नंबरवर कॉल करण्यात आला होता.

का केला होता 100 नंबरवर फोन ?
दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दिशाच्या फोनवरून कॉल केला होता. दिशा आणि तिचा होणारा नवरा रोहन यांना मालाडचं घर स्वच्च करण्यासाठी गाडीनं जायचं होतं. तिथं जाण्यासाठी ई पास कसा बनवायचा याची माहिती घेण्यासाठी पोलिसांना फोन केल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like