सुशांत सुसाईड केस प्रकरणी रियानं सोडलं मौन, म्हणाली- ‘न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास, सत्यमेव जयते ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के. के. सिंह यांनी अभिनेत्याच्या आत्महत्येच्या जवळपास दीड महिन्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह 4 जणांविरोधात एफआयआर देत गंभीर आरोप केले आहेत. मंगळवार दि 28 जुलै पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांची टीम मुंबईत आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून या प्रकरणी मोठी घडामोड घडताना दिसत आहे. या सगळ्यावर आता रियानं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

रिया म्हणाली, “माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्कीच मिळेल. इलेक्ट्रॉनिक मीडियात माझ्याबद्दल अनेक विचित्र गोष्टी बोलल्या जात आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं मी त्यावर बोलणार नाही. सत्याचा विजय होईल. सत्यमेव जयते.” रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात रियाविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर तिनं आक्षेप घेतला आहे. ही तक्रार वैध नाही असं तिचं म्हणणं आहे. पटण्याच्या राजीव नगर या परिसरात सुशांतच्या वडिलांचा प्रभाव आहे आणि बिहार पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्षापातीपणे तपास होणार नाही अशी याचिका रियानं सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. इतकंच नाही तर बिहार पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास देणं योग्य नसून मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करावा असाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like