SSY And PPF | सुकन्या समृद्धी आणि PPF वाल्यांसाठी खुशखबर, सरकार घेणार आहे हा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY And PPF | तुम्ही सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्येही गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. SSY आणि PPF चे व्याजदर सरकार लवकरच बदलू शकते. असे झाल्यास अल्पबचत योजनेत (Small Savings Scheme) गुंतवणूक करणार्‍यांना थेट लाभ मिळेल. (SSY And PPF)

 

बँका वाढवत आहेत FD आणि RD वर व्याज
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या महागाई (Inflation) च्या पार्श्वभूमीवर सरकारी बचत योजनांवरील व्याज सध्याच्या दरापेक्षा जास्त असू शकते. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांकडून एफडी आणि आरडीचे व्याजदर वाढवले जात आहेत. अशा स्थितीत सरकारी बचत योजनांवरील व्याजदरही वाढण्याची अपेक्षा आहे. (SSY And PPF)

 

30 जून रोजी घेतला जाईल व्याजदरांचा आढावा
30 जून रोजी अल्पबचत योजनेवरील व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे. हा आढावा जुलै ते सप्टेंबर 2022 तिमाहीसाठी केला जाणार आहे. यावेळी सरकारकडून या बचत योजनांवर व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे.

 

अल्पबचत योजनांवरील (Small Savings Scheme) व्याजदरात मोठ्या कालावधीपासून कोणताही बदल झालेला नाही. अशा स्थितीत महागाईचा विचार करता त्यावरील व्याज वाढवले जाऊ शकते.

व्याजदर बदलण्याची का आहे शक्यता?
लहान बचत योजनांवरील व्याज वाढवण्याच्या बाजूने बँक आणि RBI दोन्ही आहेत.
आरबीआय गव्हर्नरने काही दिवसांपूर्वी असे संकेत दिले होते की, महागाईला आळा घालण्यासाठी रेपो दरात (Repo Rate) भविष्यात वाढ केली जाऊ शकते.
कर्जाच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील रिटर्नही वाढण्याची शक्यता आहे.

 

दर तीन महिन्यांनी सुधारित केले जातात व्याजदर
सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजाचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करते.
या पुनरावलोकनादरम्यान, व्याजदर वाढवायचे, कमी करायचे की स्थिर ठेवायचे याचा निर्णय घेतला जातो.
हे व्याजदर अर्थ मंत्रालय (Finance Ministry) ठरवते.

 

कोणत्या बचत योजनेवर किती व्याज
सध्या, पीपीएफवर वार्षिक 7.1% दराने व्याज मिळते. त्याच वेळी, सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणार्‍यांना 7.6% वार्षिक रिटर्न दिला जातो.
त्याचप्रमाणे, नॅशनल सेव्हिंग्ज रिकरिंग डिपॉझिट खात्याचा रिटर्न 5.8% आहे. किसान विकास पत्रावरील व्याजदर 6.9 टक्के आहे.

 

Web Title :- SSY And PPF | modi govt may increase interest rate for ppf nsc sukanya samriddhi yojana kisan vikas patra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Income Tax Rule | 26 मे पासून इन्कम टॅक्सच्या नियमात होत आहे मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा येऊ शकता अडचणीत

 

Pune Crime | फार्मसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

 

PMC Building Construction Development | महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न यंदा घटण्याची शक्यता ! पहिल्या दोन महिन्यांत अपेक्षेपेक्षा पन्नास टक्केच उत्पन्न