SSY – Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेत झाले मोठे बदल, इन्व्हेस्ट करण्यापूर्वी जाणून घेणे अतिशय गरजेचे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY – Sukanya Samriddhi Yojana | देशात मुलींच्या प्रगतीसाठी अनेक योजना असल्यातरी आम्ही तुम्हाला ज्या योजनेबद्दल सांगणार आहोत ते नाव आहे सुकन्या समृद्धी योजना (SSY – Sukanya Samriddhi Yojana). या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च भागवता येईल. ही योजना वार्षिक 7.6% व्याजदर देते. (Big Changes In SSY)
पोस्ट ऑफिस किंवा बँकेत या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेद्वारे, तुम्हाला प्राप्तीकर नियमांनुसार 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. पण अलीकडेच सरकारने या योजनेत अनेक बदल केले आहेत (Big changes in Sukanya Samriddhi Yojana), जे तुमच्यासाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
आत्तापर्यंत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा निवासाचा पत्ता बदलल्यास बंद केले जाऊ शकत होते.
मात्र आता खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
त्यानंतर तुम्ही हे खाते बंद करू शकता. याशिवाय, पालकाच्या मृत्यूनंतरही खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. (SSY – Sukanya Samriddhi Yojana)
—
यापूर्वी, दोन मुलींच्या खात्यावर, प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत कर सूट उपलब्ध होती.
पण आता तिसर्या मुलीचा जन्म आणि तिच्या नावावर केलेल्या गुंतवणुकीलाही प्राप्तीकर कलम 80 सी अंतर्गत सूट मिळू शकते.
दुसरीकडे जुळ्या मुली असतील तर त्या दोघींचेही खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
आत्तापर्यंत, मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण झाल्यावर ती तिचे खाते चालवू शकत होती.
मात्र आता सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच चालविण्याचा अधिकार मिळणार आहे.
तत्पूर्वी मुलीचे पालक हे खाते चालवू शकतात.
Web Title :- SSY – Sukanya Samriddhi Yojana | big changes in sukanya samriddhi yojana it is very important to know before investing
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | शारीरीक संबंधाचे चित्रण करुन ते पहिल्या पतीला पाठवून केली बदनामी; वानवडी परिसरातील घटना