
SSY | दर महिना जमा करा इतके रुपये, मुलीला मिळतील एकरकमी 65 लाख; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSY | जर तुम्हाला नवीन वर्षात आपल्या मुलीला भेट द्यायची असेल तर सुकन्या समृद्धी योजना (Sukanaya Samridhi Yojna) चांगला पर्याय आहे. सरकारची सुकन्या समृद्धी योजना शानदार रिटर्न कमावण्याची संधी देते, शिवाय मुलीचे उच्च शिक्षण, करियर आणि विवाहासाठी निश्चिंत होऊ शकता. 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत (SSY) अकाऊंट उघडता येऊ शकते.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना (SSY) मुलींसाठी केंद्र सरकारची एक छोटी बचत योजना आहे. जी बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेंतर्गत लाँच करण्यात आली आहे. छोट्या बचत योजनांमध्ये सुकन्या चांगले व्याज देणारी योजना आहे.
कसे उघडावे खाते
10 वर्ष वयापर्यंत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते. किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. घरातील दोन मुलींसाठी हे खाते उघडता येते. जर जुळ्या असतील तर तिसर्या मुलीसाठी सुद्धा योजनेचा लाभ घेता येईल. सुकन्या समृद्धी योजनेत कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता. यावर वार्षिक व्याज 7.6 टक्के आहे. मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर स्कीम मॅच्युअर होईल.
कुठे उघडावे खाते
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत अकाऊंट (SSY Account) कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रँचच्या अधिकृत शाखेत उघडता येऊ शकते.
416 रुपये रोज बचतीने होतील 65 लाख रुपये
1. आता 416 रुपयांची रोज बचत केली तर महिन्याचे होतात 12,500 रुपये
2. 12,500 रुपये दरमहिना जमा केले तर वर्षाचे झाले 15,00,00 रुपये
3. ही गुंतवणुक केवळ 15 वर्ष केली तर एकुण गुंतवणुक झाली 2,250,000 रुपये
4. 7.6 टक्के वार्षिक व्याजाच्या हिशेबाने एकुण व्याज मिळेल 4,250,000 रुपये
5. जेव्हा मुलगी 21 वर्षाची होईल तर स्कीम मॅच्युअर होईल, त्यावेळी एकुण मॅच्युरिटी अमाऊंट होईल 6,500,000 रुपये
कधीपर्यंत अकाऊंट राहिल
मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर स्कीम मॅच्युअर होईल. या योजनेत तुमची गुंतवणूक किमान तोपर्यंत लॉक होईल जोपर्यंत मुलगी 18 वर्षाची होत नाही.
Web Title :- SSY | sukanya samriddhi yojana happy new year resolution know details SSY
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ration Card शिवाय सुद्धा हे लोक घेऊ शकतात सबसिडीचे धान्य, सरकार ‘या’ प्लानवर करतंय काम; जाणून घ्या