बस स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवेशद्वारावर दोन अपघाताच्या घटना

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी आगाराची अंधापुरी मुक्कामी एसटी बस क्रमांक एम एच 06 एस 8639 शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गाने हि एस टी बस स्थानकात येत असताना रस्त्यावरील प्रवेशद्वारावर एम एच 21 बीके 9619 या दुचाकी सोबत अपघात घडला. यात पांडे पोखरी, जिल्हा जालना येथील हरिभाऊ ज्ञानोबा भेंबळे वय 25 वर्षे याला एका पायाच्या गुडघ्याला दोन टाके पडले असून हाताची करंगळी फॅक्चर झाली. पायाच्या अंगठ्याचे कातडे निघाले, छातीला मुक्कामार लागला असल्याचे कळते.

तर दुसऱ्या घटनेत पाथरी तालुक्यातील गोपेगाव येथील नानाभाऊ सोनाजी गायके वय 65 वर्षे यांचा अपघात बसस्थानकातुन बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारावर बीड आगाराच्या आगाराच्या घडला बीड/यवतमाळ एम एच 20 बीएल 3880 या क्रमांकाच्या एसटी बसने घडला यात नानाभाऊ गायके यांच्या पायावरुन एसटी बसेसचे चाक गेले या अपघाताच्या दोन्ही घटना एकाच दिवशी शनिवारी 28 सप्टेंबर रोजी रोज घडल्या.

पाथरी आगाराच्या एसटी बसने सकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास पांडे पोखरी येथील तरुणांचा अपघात घडला तर त्याच दिवशी अपघाताची दुसरी घटना पावणे चारच्या सुमारास घडली. पहिल्या अपघात जखमीला पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तर नानाभाऊ सोनाजी गायके यांच्यावर परभणी येथे उपचार चालू असल्याचे कळते.

Visit : policenama.com