सातार्‍यात धावत्या ST बसमध्येच चालकाला आला ‘हार्टअ‍ॅटॅक’, पुढं झालं ‘असं’ काही

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – महामार्गावरून भरधाव असलेल्या एसटीच्या चालकाला अचानक हार्टअ‍ॅटॅक आल्याने अपघात झाला आहे. साताऱ्यातील खिंडेवाडीजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून कराडकडे ही एसटी बस जात होती.

एसटी बस (MH 20 Bl 3667) सकाळी साडेदहाच्या सुमारास खिंडवाडी परिसरात आली. यावेळी चालक विकास मारूती पवार (वय 39) यांना अचानक हार्टअ‍ॅटॅक आला. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक तोडून एसटी विरूद्ध लेनवर झाडीत जाऊन धडकली. या अपघातात समोरून येणाऱ्या दुचाकी वरील दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चालकाला सातारा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Visit : Policenama.com