ST Bus | मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरुन लालपरी धावणार नाही, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; जाणून घ्या कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाने (ST Bus) एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरुन धावणारी लालपरी आता यापुढे या मार्गावरुन धावणार नाहीत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन केवळ शिवनेरी बस (Shivneri Bus) धावणार आहेत. सध्या एसटीच्या (ST Bus) अनेक बसेस एक्सप्रेसवे वरुन जात असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला (ST Corporation) बसत आहे. प्रवासी कमी आणि टोल जास्त असा दुहेरी फटका बसत असल्याने महामंडळाचे नुकसान होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन एसटी बस धावत नसल्याने जवळपास 30 ते 50 टक्के प्रवासी संख्या घटल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, आता एसटीच्या (ST Bus) साध्या बस या जुन्या मार्गावरुन चालवण्याचे आदेश दिले आहेत. शिवनेरी वगळता इतर बसेने एक्सप्रेसवेवरुन प्रवास केल्यास त्या दरम्यान ई-टॅगमधून वळती करण्यात आलेली अधिकच्या फरकाची रक्कम चालकाकडून वसूल केली जाईल. तसेच अशा चालकांवर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action) केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे. यापूर्वी, एसटीच्या साध्या बसेस या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन चालवल्या जात होत्या. मात्र, काही चालक परस्पर एक्सप्रेसवेवरुन बसेस चालवत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

पूर्वी जुन्या मुंबई-पुणे मार्गावरुन एसटी बसेस धावत होत्या. मेगा हायवे (Mega Highway) झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व गाड्या त्या या मार्गावरुन धावू लागल्या. शिवनेरी वगळता इतर बसेसही एक्सप्रेसवे वरुन धावू लागल्या. त्यामुळे प्रवासी भारमान कमी झाले. त्याचा परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर झाला.
त्यामुळे महामंडळाने बेशिस्त एसटी चालकांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, हुबळी, बेंगळुरू, मंगलोर मार्गाकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस आता
जुन्या माहामार्गा वरुन धावणार आहेत.

 

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन एका बसला 485 रुपये टोल (जाता-येता) द्यावा लागतो.
तर नवीन एक्सप्रेस वेवरुन जाण्यासाठी त्याच बसला 675 रुपये टोल (जाता-येता) द्यावा लागतो.
एका बसमागे एका फेरीमागे 190 रुपयांचा भुर्दंड एसटी महामंडळावर पडतो.

 

Web Title :- ST Bus | msrtc will run st bus on mumbai pune old express due to huge passenger loss only shivneri bus will run on express way

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप