आजपासून ‘लालपरीचा’ प्रवास महागणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली 18 टक्के भाडेवाढ आज (15 जून) मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. डिझेलचे वाढते दर, सुट्ट्या पैशांचा वाद आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे ही तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.

तिकीट दरवाढीमुळे 7 रुपयांच्या तिकिटांसाठी आता 5 रुपये आणि 8 रुपयांच्या तिकिटांसाठी 10 रुपये आकारण्यात येतील, अशी माहिती महामंडळाने दिली.

असे असतील नवे दर…

नवीन तिकीटदरांमुळे मुंबई ते पुण्यापर्यंत शिवशाहीचे तिकीट २५३ रुपयांवरून ३०० रु तर मुंबई ते नाशिक साध्या बसचे तिकीट १८२ वरून २१५ रु. तर मुंबई ते कोल्हापूरचे तिकीट ४१७ रुपयांवरून ४९० रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.