एसटी प्रवास आणखी महागणार, १८ टक्के भाडेवाढीचा पुन्हा प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पेट्रोल, डिझेलची सातत्याने दरवाढ होत असल्याने सर्वसमान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यातच महागाईदेखील वाढत असल्याने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आता एसटीने प्रवास करणे सुद्धा परवडणार नाही. कारण एसटी महामंडळाने पुन्हा १८ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव आखला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही वाढ किमान १० टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वीच महामंडळाने १८ टक्क्यांची भाडेवाढ लागू केली होती. आता पुन्हा दरवाढ केली जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d71e34f-c78c-11e8-9cad-c32002718b1c’]

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बस आहेत. काही वर्षांपर्यंत सबसिडीने डिझेल मिळत असल्याने महामंडळाचा तोटा कमी प्रमाणात होता. पण सबसिडी संपुष्टात आल्याने तोटा वाढत असून तिकीट दरातही वाढ करावी लागत आहे. त्यातून प्रवाशांनीही एसटी सेवांकडे पाठ फिरवल्याचे चित्र वारंवार दिसले. आता नव्याने भाडेवाढ केल्यास प्रवासी खासगी वाहनांकडे वळण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नांवर होऊ शकतो. सध्या खासगी वाहनाचा प्रवास दर आणि एसटीचा प्रवास दर यात फार मोठा फरक राहिलेला नाही.

राज्यात साडेचार हजार जणांना डेंग्यू, स्वाइन फ्लूची लागण, आतापर्यंत १२९ बळी!

ऑक्टोबरमध्ये डिझेलचा दर ७१ रु. ८७ पैशांवर गेला असून एप्रिलमध्ये डिझेलसाठी प्रति लीटर ६३ रु. ७६ पैसे इतका दर मोजावा लागत होता. या वाढीव दराने महामंडळाच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी भाडेवाढीचा उपाय शोधला जात आहे. महामंडळास दररोज सरासरी १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेलची आवश्यकता आहे. त्यानुसार एसटीस दर वर्षास डिझेलसाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये मोजावे लागतात. या पाश्र्वभूमीवर महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव आखला आहे.  महामंडळाने यापूर्वी १५ जून रोजी १८ टक्के वाढ केली होती. त्यास तीन महिने उलटत नाहीत तोच पुन्हा नवीन भाडेवाढ होणार आहे. भाडेवाढीसाठी प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला जातो. तिथे मान्यता मिळाल्यानंतरच भाडेवाढ लागू होते.

[amazon_link asins=’B00WIX0CUK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b867a8fe-c78c-11e8-bbc0-ed83db73baa5′]