एसटी महामंडळाने जखमी प्रवाशांना आर्थिक मदत नाकारली

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड- माळशेजघाट महामार्गावर एसटी बस अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना एसटी महामंडळाने आर्थिक मदत नाकारली आहे. त्यामुळे जखमींच्या नातेवाईकांनी आज मुरबाड आगार प्रमुखांना घेराव घातला.

मुरबाड-माळशेज घाट महामार्गावरील खरब्याची वाडी जवळ 31 ऑक्टोबर रोजी मुरबाड- तुळई-गोरखगड या एसटी बसचा व खाजगी ट्रॅव्हलचा अपघात झाला होता. अपघातात एसटी बसमधील 20 हून जास्त प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.

अपघातात जखमी झालेले अनेक प्रवाशी आजही खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. मात्र त्यांना एसटी महामंडळाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे डॉक्टर त्यांना बरे होऊनही डिस्चार्ज देत नाहीत. या पार्श्वभूमीवर आज स्वराज्य प्रतिष्ठान व संतप्त जखमींच्या नातेवाईकांनी मुरबाड आगार प्रमुखाना लेखी निवेदन देऊन घेराव घातला. गुरुवार पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास पुढील आंदोलन छेडण्याचा यावेळी इशारा देण्यात आला.

या घेराव आंदोलनाची माहिती कळताच मुरबाड आगार प्रमुख सतीश मालचे यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन सासे, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे, सेना युवा कार्यकर्ते बाळा चौधरी, भाजपचे संतोष पवार, सुजित ठाकरे, मनसेचे सागर भंडारी, काँगेस तालुका अध्यक्ष कृष्णकांत तुपे असे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like