ST Corporation Recruitment | एसटी महामंडळात 5 हजार कंत्राटी चालकांची लवकरच भरती; व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Corporation Recruitment | मागील पाच ते सहा महिन्यामध्ये राज्यभर एसटी कामगारांनी संप (ST Workers Strike) पुकारला होता. त्या काळात प्रवाशांची अधिकच तारांबळ उडाली. पाच महिन्यानंतर मुंबई हाय कोर्टाच्या (Mumbai High Court) निर्देशानंतर अखेर संप मिटला. आंदोलनादरम्यान अनेक घडामोडी घडल्या. एसटी कामगारांच्या या संपातून बोध घेत एसटी महामंडळाकडून (MSRTC) सुमारे पाच हजार कंत्राटी चालकांची भरती (ST Corporation Recruitment) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आगामी दोन ते तीन दिवसामध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (MSRTC Recruitment)

 

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) म्हणाले, “महामंडळाने एसटी कामगारांच्या बेमुदत संपानंतर कंत्राटी चालकांची भरती केली होती. मात्र, संप मिटताच या कंत्राटी चालकांना कामावरुन कमी करण्यात आलं होतं. तर, काहींना मुतदवाढही देण्यात आली होती. त्यात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या विभागांतील कंत्राटी चालकांचा समावेश आहे. त्यामुळे, आता, ५ हजार कंत्राटी चालकांची खासगी कंपनीमार्फत भरती करण्यात येईल़ ही भरती टप्प्याटप्प्याने होईल, याबाबतची जाहिरात 2-3 दिवसांत काढण्यात येणार असल्याचे,” ते म्हणाले. (ST Corporation Recruitment)

 

पुढे ते म्हणाले, “राज्यातील कोकण, पुणे विभागासह इतर काही विभागांत एसटीच्या चालकांची कमतरता भासत आहे. त्यातूनच, अनेकदा बसगाड्या स्थानकातच पडून राहतात. त्यामुळे, महामंडळाकडून नव्याने पाच हजार कंत्राटी चालकांची भरती केली जाणार आहे. सध्या परीक्षा देऊन ”प्रतीक्षा यादीवर असलेले कर्मचारी हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून एसटीत येऊ शकतात. एसटीतील निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास, लवकरच प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळेल, याबाबतचा निर्णय लवकरच होईल.”

 

Web Title :- ST Corporation Recruitment | MSRTC st-corporation-recruits-5000-contract-drivers-soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ola Electric Car | Ola च्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टीजर व्हिडिओ जारी, दमदार आहे तिचा फ्यूचरिस्टिक लुक

 

India Post Payments Bank-IPPB च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी ! RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड असणार्‍यांना भरावा लागेल नवीन चार्ज

 

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे