ST Employee Salary | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून 200 कोटी रुपये मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांचा (ST Employee Salary) नोव्हेंबर महिन्याचा पगार रखडला होता. महाराष्ट्र एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास पुरेसा निधी नव्हता. त्यामुळे हे पगार रखडले होते. पण, आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक वृत्त आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शुक्रवारी 200 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णयदेखील शासनाकडून (ST Employee Salary) जारी करण्यात आला आहे.

 

त्यामुळे निधीअभावी रखडलेला नोव्हेंबर महिन्याचा पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एसटी महामंडळाला (ST Employee Salary) दर महिन्याला राज्य सरकारकडून 360 कोटी रुपये देण्यात येतात. पण, नोव्हेंबर महिन्यात हा निधी देण्यात आला नव्हता. परिणामी, कर्मचाऱ्यांचे पगार तुंबले होते. एसटी कामगार संघटना याबाबत तक्रारदेखील करत होत्या. पण, आता प्रश्न सुटला आहे. कामगारांचे वेतन त्यांना मिळणार आहे.

 

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि अन्य लाभ मिळावे, यासाठी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे,
या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिने संप केला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात काही अंशी वाढ केली गेली होती.
एसटी महामंडळ चार वर्षांत फायद्यात येईल, या अटीवर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी देण्याची जबाबदारी तत्कालीन राज्य सरकारने घेतली होती.
त्यानुसार राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला दर महिन्याला वेतनासाठी 360 कोटी रुपये मिळत होते.
मात्र, जुलै 2022 पासून शासनाकडून फक्त 100 कोटी निधी मिळू लागला होता. त्यावरदेखील संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती.

 

Web Title :- ST Employee Salary | fund sanctioned by govt for salary of st employees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम