धक्कादायक ! मुंबईत सेवा दिल्यानंतर सांगलीत परतलेल्या 80 हून अधिक एसटी कर्मचार्‍यांना ‘कोरोना’ची बाधा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईहून सेवा बजावून सांगलीत (who-returned-to-sangli-after-worked-in-mumbai) परतलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या 9 डेपोंमधील 80 हून अधिक चालक – वाहकांना कोरोना (st-employees-tested-corona-positive) झाल्याचे समोर आले आहे. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे एस.टी प्रशासनाची धाकधूक वाढली आहे.दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली. अनलॉक प्रक्रियेत सर्व पूर्ववत करण्यासाठी बेस्ट आणि एसटी सेवा सुरु करण्यासाठी परवानगी दिली. परंतु, लोकल सेवा बंद असल्यामुळे बेस्ट सेवेवर संपूर्ण ताण पडत होता. त्यामुळे राज्यांतील प्रमुख एसटी बस डेपोमधून काही बसेस या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी मुंबईत सेवा देत होते. सांगली जिल्ह्यातूनही 100 च्या आसपास एसटी बस या मुंबईत दाखल झाल्या होत्या. तसेच जवळपास 400 कर्मचारी हे गेल्या 12 दिवसांपासून मुंबईत सेवा देत होते.

या कर्मचाऱ्यांचा सेवेचा कालावधी संपल्यामुळे दोन दिवसांपूर्वी नवीन 400 जणांची टीम मुंबईत दाखल झाली. सुरुवातीला सेवा देण्यासाठी हजर झालेले कर्मचारी पुन्हा आपल्या जिल्ह्यात परतले आहेत. परतल्यानंतर त्यांची रॅपीड ॲन्टीजन टेस्ट केली. त्यामधील काही कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 डेपोमधील 80 चालक-वाहक बाधित झाल्याचे समोर आले आहे.