ST Fare Hike | सर्वसामान्यांसाठी वाईट बातमी, दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला, प्रवास भाड्यात 75 रुपयांपर्यंत हंगामी वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी परवडणारी एसटी बस आता दिवसेंदिवस महाग (ST Fare Hike) होत चालली आहे. अगोदरच एसटी महामंडळाने इंधन दरवाढीच्या (Fuel Price Hike) नावाखाली भरपूर प्रवास भाडेवाढ (ST Fare Hike) केलेली असताना आता दिवाळी सणानिमित्त पुन्हा हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना खिशावर डल्ला मारण्याचा एसटी महामंडळाचा (ST Corporation) हा प्रकार मागील काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.

 

आता दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने एसटी प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ (ST Fare Hike) केली आहे. ही वाढ हंगामी असून दिवाळीत महसूल वाढीसाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी ही एसटी प्रवास भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ सर्वसामान्यांच्या लालपरी साठी लागू आहे.

 

ही भाडेवाढ 10 दिवसांसाठी असून ती साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

 

ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील.

या गाड्यांचा प्रवास महागला

– दादर (Dadar) ते स्वारगेट (Swargate) – साधी – सध्या 235 प्रस्तावित – 260
– दादर ते स्वारगेट – शिवशाही सध्या 350 प्रस्तावित – 385
– मुंबई (Mumbai) ते कोल्हापूर (Kolhapur) – साधी गाडी सध्या – 565, प्रस्तावित – 625 , शिवशाही – सध्या 840, प्रस्तावित – 925
– मुंबई ते नाशिक (Nashik) – साधी गाडी सध्या 400, प्रस्तावित 445, शिवशाही – 595, प्रस्तावित 655
– (Mumbai) मुंबई ते औरंगाबाद (Aurangabad) – साधी गाडी सध्या – 860 प्रस्तावित – 950, शिवशाही – सध्या 1280 प्रस्तावित – 1410

 

दिवाळीत गावी किंवा पर्यटनासाठी जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा बस गाड्या (Extra Buses for Diwali Vacation) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल.

 

सध्या वाढवलेल्या जादा बसेसची संख्या

औरंगाबाद – 368
मुंबई – 228
नागपूर – 195
पुणे – 358
नाशिक – 274
अमरावती – 71

 

Web Title :- ST Fare Hike | msrtc st travel will be expensive ahead of diwali seasonal increase in travel fare up to rs 75

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर