ST Fare Hike | एसटीची दिवाळी हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू, प्रवाशांच्या खिशावर 5 ते 75 रुपयांचा भार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीच्या सणात महसुल वाढवण्यासाठी एसटी महामंडळ दरवर्षी या काळात प्रवास भाड्यात वाढ (ST Fare Hike) करते. आधी जाहीर केल्यापासून आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ एसटीने लागू (ST Fare Hike) झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशावर 5 रुपये ते 75 रुपयांचा भार पडणार आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार आहे. यामुळे दिवाळीच्या सणात (Diwali Festival) गावी जाणार्‍या सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

 

दरम्यान, महाराष्ट्र परिवहन महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ (ST Fare Hike) ही प्रवाशांना परवडणारी नसून हे भाडेवाडी रद्द करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी ही एसटी प्रवास भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ सर्वसामान्यांच्या लालपरी साठी लागू आहे.

 

ही भाडेवाढ 10 दिवसांसाठी असून ती साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

 

ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू नाही. 1 नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील.

या गाड्यांचा प्रवास महागला
– दादर (Dadar) ते स्वारगेट (Swargate)- साधी – सध्या 235 प्रस्तावित – 260

– दादर ते स्वारगेट – शिवशाही सध्या 350 प्रस्तावित – 385

– मुंबई (Mumbai) ते कोल्हापूर (Kolhapur) – साधी गाडी सध्या – 565, प्रस्तावित – 625 , शिवशाही – सध्या 840, प्रस्तावित – 925

– Mumbaiते नाशिक (Nashik) – साधी गाडी सध्या 400, प्रस्तावित 445, शिवशाही – 595, प्रस्तावित 655

– मुंबई ते औरंगाबाद (Aurangabad) – साधी गाडी सध्या – 860 प्रस्तावित – 950, शिवशाही – सध्या 1280 प्रस्तावित – 1410

 

दिवाळीत गावी किंवा पर्यटनासाठी जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त 1494 जादा बस गाड्या (Extra Buses for Diwali Vacation) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही जादा वाहतूक 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल.

 

धुळे जिल्ह्यातील एसटी प्रवास भाड्यात अशी वाढ झाली आहे

धुळे-मुंबई 560 रुपये
धुळे-पुणे 560 रुपये
धुळे-औरंगाबाद 250 रुपये
धुळे-नाशिक 260 रुपये
धुळे-नाशिक शिवशाही बस 395 रुपये
धुळे-जळगाव 155 रुपये
धुळे-दोंडाईचा 95 रुपये
धुळे-शिंदखेडा 80 रुपये

 

Web Title :- ST Fare Hike | st fare hike seasonal fare hike of rs 5 to rs 75 applicable for st travel from today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhaskar Jadhav | पुन्हा जर सिंधुदुर्गात येऊन नारायण राणेंबद्दल बोलला, तर…, निलेश राणे यांचा भास्कर जाधवांना धमकीवजा इशारा

Pune CP Amitabh Gupta On Traffic | पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचे मोठे पाऊल

Pune Crime | न्यायालयाने फटकारल्यानंतर हडपसर पोलिसांनी बलात्कार प्रकरणी दाखल केला गुन्हा