‘एसटी’ कर्मचाऱ्यांना अच्छे दिन ! ST महामंडळाचे शासनात ‘विलीनीकरण’ होणार ?

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या आपल्या वेतनवाढीमुळे आणि मागण्या पूर्ण न झाल्याने नाराज आहेत. नव्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले, आता याच सरकारमुळे एसटी महामंडळाला नवे दिवस येतील अशी अपेक्षा आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही मागणी पत्राद्वारे कळवण्यात आली आहे.

ही मागणी यासाठी आहे कारण विलीनीकरण झाल्यास एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळेल. तसेच शासनाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल.

राज्यात 250 एसटी डेपो आणि 18 हजार एसटी बसेस आहेत. महामंडळाचे एकूण 1 लाख 5 हजार कर्मचारी आहेत. एसटी महामंडळ सध्या पाच हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यांना या मागण्या घेऊन संप देखील केले आहेत. प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने काही उपाय योजना या अधिसूचनेच्या माध्यमातून सुचवल्या होत्या.

या अधिसूचनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व खासगी वाहतूक बसेस, स्कूल बसेस, मालवाहू वाहन, कंपनी मालकीच्या बसेस या प्रवासी वाहतूकीला मान्यता देण्यात आली. खरंतर एसटी महामंडळाला ही तात्पुरता दिलासा होता. आता कायम स्वरुपी तरतूद व्हावी अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Visit : Policenama.com

You might also like