‘लालपरीची’ होणारी दरवाढ तुर्तास टळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एसटी महामंडळाने घोषित केलेली १८ टक्के भाडेवाढ आज (१५ जून) मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचे नुकतेच एसटीने घोषित केले आहे. मात्र याला राज्य परिवहन मंडळाने मान्यता दिली नसल्या कारणाने एसटी महामंडळाची दरवाढ पुढे ढकलण्यात आली आहे. डिझलचे वाढते दर, सुट्ट्या पैशांचा वाद, कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे महामंडळावर आर्थिक बोजा वाढल्यामुळे मुंबई- एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दरात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटीनं घेतला होता.

आज मध्यरात्रीपासुन एसटीची १८ टक्के दराने भाडेवाढ करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याला राज्य परिवहन प्रधिकरणानाची मान्यता मिळाली नसल्याने तुर्तास ही भाडेवाढ टळली आहे. वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यासाठी ही दरवाढ करणं अपरिहार्य असल्याचं कारण एसटी महामंडळानं दिलं होतं. दरम्यान एसटी प्रवासासाठी भाडे आकारणी ५ रुपयांच्या पटीत केली जाणार आहे. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि एसटी वाहकांत नेहमीच वादवाद होते. यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं एसटी महामंडळाने सांगितलं आहे.

आजपासून ‘लालपरीचा’ प्रवास महागणार