खुशखबर ! आता ‘Paytm’वर एसटीची तिकिटे मिळणार, जाणून घ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – ऑनलाइनचा जमाना असल्यामुळे सध्या सगळ्याच गोष्टी ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत आणि खाण्यापासून ते मुव्ही तिकिटांपर्यंत सर्वकाही ऑनलाइन मिळते. आतापर्यंत प्रवासासाठी विमान किंवा रेल्वेचे ऑनलाइन बुकिंग करता येत होते. आता मात्र एस टी गाड्यांचे सुद्धा ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘पेटीएम’ने ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’शी (ST) भागीदारी केली आहे.

एसी – शिवनेरी, शिवशाही, शिवशाही स्लीपर, सेमी लक्झरी, डे ऑर्डिनरी, नाइट एक्स्प्रेस, ऑर्डिनरी एक्स्प्रेस आदी बसचे तिकीट ‘पेटीएम’च्या माध्यमातून बुक करता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे प्रवाश्यांना आता रांगेत थांबण्याची गरज पडणार नाही. पेटीएमचे उपाध्यक्ष अभिषेक राजन म्हणाले, ‘बसच्या प्रवाशांना सुलभतेने आणि सोयीस्कररीत्या बस तिकीट आरक्षित करता यावे यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करता येणार आहे.

सध्या आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, ओडिशा, या राज्यामध्ये पेटीएम तिकीट सेवा आधीपासून सुरु आहे. या ऑनलाइन पद्धतीमध्ये प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेळ वाचवणारा होणार आहे. आता प्रवाशांना भल्या मोठ्या लाईनमध्ये उभे राहण्याची गरज पडणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like