ST Workers Suicide | काही दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या पुण्यातील एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Suicide | एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये (State Government) विलीनीकरण (Merger) करावे या मागणीसाठी राज्यातील अनेक एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या असून त्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. मात्र संपकरी एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने राज्य सरकारने कठोर कावाई करत कर्मचाऱ्यांचे निलंबन (Suspension) केले आहे. सरकारच्या या कारवाईमुळे कर्मचारी टोकाचं पाऊल उचलत आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली आहे. काही दिवसांपूर्वी निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास (Hanging in Pune) घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली. (ST Workers Suicide)

 

संजय सरवदे (Sanjay Sarvade) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभाग घेतल्याने सरवदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सरवदे यांनी घरातील बाथरुमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. त्यांच्या पश्चात तीन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. सरवदे यांनी आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप समजू शकले नाही. (ST Workers Suicide)

 

 

संजय सरवदे हे वल्लभनगर एसटी आगारात (Vallabhnagar ST Depot) चालक (Driver) म्हणून कार्यरत होते. ते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांचे काही दिवसांपूर्वी निलंबन झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. रात्री साडेआठच्या सुमारास घरात पत्नी, मुलांसोबत जेवण झाल्यानंतर त्यांनी बाथरुममध्ये जाऊन गळफास घेतला. बराच वेळ झाला तरी वडील बाहेर येत नसल्याने मुलांनी बाथरुमचा दरवाजा ढकलून पाहिले. त्यावेळी संजय सरवदे यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

 

दरम्यान, अद्याप संजय यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकले नाही.
त्यांनी निलंबनाच्या नैराश्यातून आत्महत्या केली की आणखी दुसरं कारण होतं,
हे समोर आलेलं नाही. घटनेची नोंद सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- ST Worker Suicide | st employee suicide in pimpri chinchwad Pune Crime News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा