ST Worker Suicide | धक्कादायक ! 3 महिने पगार नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ST Worker Suicide | गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कामगारांनी एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासाठी आपला लढा चालू ठेवला आहे. न्यायालयामध्ये आता हा लढा चालू आहे. तीन महिन्यांपासून आंदोलनाचा लढा चालू ठेवला आहे. या लढ्यात अनेकांनी आपलं जीवन संपवलं अशातच उस्मानाबादमधील (Osmanabad) आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या (ST Worker Suicide) केली आहे.

 

हनुमंत चंद्रकांत आकोसकर (Hanumant Chandrakant Akoskar) असं संबंधित एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.
गेल्या तीन महिन्यांच्या संपामुळे त्यांना पगार मिळाला नाही. आई – वडिल, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
हनुमंत यांनी आत्महत्या केल्यामुळे आकोसकर यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आकोसकर हे तुळजापूर या डेपोमध्ये वाहक म्हणून काम करत होते. (ST Worker Strike) संपामध्ये पहिल्या दिवसापासून त्यांनी सहभाग घेतला होता. मात्र जवळपास 90 दिवसांचा कालावधी लोटला तरी काही तोडगा निघत नसल्याने आकोसकर नैराश्यामध्ये होते. (ST Worker Suicide)

संप लांबतच चालला होता मात्र दुसरीकडे घरात आर्थिक भारही डोक्यावर होता.
घरचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा याची काळजी त्यांना लागून राहिली होती त्यामुळे ते नैराश्यातही गेले आणि विष प्राशन (Poisoning) करत त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

 

आकोसकर यांच्या आत्महत्येची माहिती समजताच संपकऱ्यांनी त्यांचा मृतदेह आंदोलनाच्या ठिकाणी आणला.
त्यानंतर सरकार आणखी किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार आहे, अशी घोषणाबाजी केली.
तीन ते चार तासानंतर तेथे एसटीचे कर्मचारी आले आणि आकोसकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचं (Financial Help) आश्वासन दिलं त्यानंतर आकोसकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) केले.

 

Web Title :-  ST Worker Suicide | st strike in maharashtra one more st worker suicide in osmanabad msrtc news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा