ST Workers Agitation | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं या मागण्यासठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन (ST Workers Agitation) सुरु केले आहे. पण आता विलगिकरण मागणी व्यतिरिक्त इतर मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत रुजू व्हावे, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केले आहे. काही मागण्या मान्य करुन देखील कर्मचारी आपल्या आंदोलनावर (ST Workers Agitation) ठाम आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने (Thackeray Government) प्रवाशांची पिळवणूक थांबवण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी (private vehicles) परवानगी दिली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यावर त्यांना प्रवासी वाहतूक बंद करावी लागणार आहे.

 

दिवाळी संपली तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर (ST Workers Agitation) कोणताही तोडगा निघाला नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी समिती स्थापन केली आहे. परंतु एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलले आहे.

परिवहन विभागाने आता एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. एसटी महामंडळाच्या (ST Corporation) विविध संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिक आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी मोटार अधिनियम 1988 (1988 चा 59) चे कलम 66 चे उपकलम खंड (N) अधिकारानुसार सर्व खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस या मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी (Permission) देण्यात आली आहे. ही परवानगी एसटी कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही, तोपर्यंत लागू राहणार आहे. एसटी कर्मचारी (ST staff) कामावर परतल्यानंतर ही अधिसूचना रद्द होईल असेही परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

 

Web Title : ST Workers Agitation | st bus strike the state government has allowed private vehicles to carry passengers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jilha Nivad Samiti Jalna Recruitment | जिल्हा निवड समिती जालना इथे थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून घ्या सविस्तर

Induslnd Bank Recruitment 2021 | 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इंडसइंड बँकेत 150 जागांसाठी भरती; जाणून घ्या

Devendra Fadnavis | फडणवीसांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका; म्हणाले, – ‘हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत आणि आम्हाला सांगून राहीले…’