ST Workers Strike | 200 एस.टी. कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचे राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी अनेक एसटी कामगार अद्याप ठाम आहेत. मात्र यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने कामगार अधिक आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, पंचवटी आगारातील सुमारे 200 संपकरी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे.

संपकरी एसटी कामगारांना (ST Workers Strike) न्याय मिळणार नसेल आणि एकेक एस.टी. कर्मचारी बांधव आत्महत्या करीत असल्याने कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटू लागल्याने त्यांना इच्छा मरणाची परवानगी मिळावी, असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector) प्रवेशद्वारावर देण्यात आले आहे. निवेदना पत्रावर 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी (Signature) केलीय. दरम्यान, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा एस.टी. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही शासनाकडून सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य (Depression) आल्याचे निवेदनात नमूद केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून एस.टी. कर्मचारी (ST workers) संपावर आहेत. नाशिकमधील सर्वच्या सर्व 13 डेपोंमधील कर्मचाऱ्यांनीही संपात सक्रिय सहभाग घेतला आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी 98 टक्के कर्मचारी अद्याप संपावर आहेत. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना त्यामध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय होईल असे वाटत असताना आता बडतर्फीची कारवाई सुरू झाली आहे. यामुळेही कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Web Title : ST Workers Strike | 200 MSRTC employees asked permission die voluntarily nashik

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर