ताज्या बातम्यापुणे

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. त्यावर राज्य सरकार (Maharashtra Government) तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ (Salary increase) करण्याचे जाहीर केले. परंतु विलिनीकरणाच्या (Merger) मागणीसाठी काही कर्मचारी अद्यापही संपावर (ST Workers Strike) ठाम असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. शिवाजीनगर डेपोमध्ये (Shivajinagar Depot) काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला सेवा समाप्तीचे पत्र (service termination Letter) आल्यानंतर हृदयविकाराचा झटका (Heart attack) आला आहे.

 

मारुती घडसिंग असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचारी शिवाजीनगर डेपो येथे आंदोलनाला (Agitation) बसलेले असताना ते पत्र वाचून अचानक घडसिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घरी नेण्यात आले. परंतु दुखणे असह्य झाल्याने त्यांना तातडीने धानोरी (Dhanori) परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (ST Workers Strike)

 

जळगावातही घडली घटना

निलंबनाची नोटीस मिळाल्याच्या धक्क्याने चोपडा आगारातील (Chopda depot) संपात सहभागी बस कर्मचारी चक्कर येऊन पडल्याची घटना घडली. चोपडा आगारातील चालक बी.एम. कोळी यांना भोवळ येऊन त्यांची तब्येत अचानक खालावली. बी.एम. कोळी यांना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आगार प्रमुख यांनी कार्यालयात बोलावले होते. त्या ठिकाणी त्यांना निलंबनाची नोटीस (suspension Notice) देण्यात आली.

 

निलंबनाच्या नोटीशीने कोळी यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले.
हे पाहून उपस्थितांनी त्यांना ताताडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात (Chopda Sub-District Hospital) दाखल केले.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. सागर पाटील यांनी सांगितले.
यावेळी कर्मचारी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
कोळी यांच्यासह 5 जण कामावर हजर न झाल्याने त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली, असे आगार प्रमुखांनी सांगितले.

 

Web Title :- ST Workers Strike | an employee at the pune shivajinagar depot suffered a heart attack after receiving a termination letter incident happen in jalgaon also

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या ‘मुन्नी’नं शेअर केला व्हिडिओ, करिना कपूरच्या अंदाजामध्ये म्हणाली…

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज; ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’कडून ‘पर्दाफाश’

Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय

Back to top button