ST Workers Strike | ‘एसटी आंदोलनात पडळकर, सदाभाऊ खोत तेल ओतण्याचे काम करतात’, शिवसेनेचा घणाघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा (ST Workers Strike) फटका ग्रामीण भागात (rural areas) मोठ्या प्रमाणात बसत आहे. खरं म्हणजे एसटी सुरु व्हायला पाहिजे. एसटी कर्मचारी आणि सरकार (Government) यांच्यात मध्य व्हायला पाहिजे आणि त्यातून तोडगा निघायला हवा. राजकीय लोकांनी यात ढवळाढवळ करु नये. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे या आंदोलनात (Agitation) तेल ओतण्याचे काम करत आहेत. त्यांचे सरकार असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike) राज्य शासनात विलीनिकरण का केले नाही, असा सवाल राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

 

सत्तार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Strike) प्रश्नाशी मी सहमत असून सरकारने यात मार्ग काढून मध्यस्ती करायला पाहिजे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि जोपर्यंत ते येत नाही आणि कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) होत नाही तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. एक महामंडळ नसून सर्वच महामंडळाचा विचार करावा लागणार आहे, असं देखील त्यांनी यावेळी म्हटले.

 

यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादचे (Aurangabad) नामकरण लवकरच संभाजीनगर (Sambhajinagar) होणार आहे.
चंद्रकांत दादा ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. मात्र ते देव पाण्यात घालून बसले आहेत.
त्यांना वाटतं की कधी तरी सरकार पडेल आणि बाभळीच्या झाडा खाली बसलेत ते आंब्याच्या झाडाखाली बसतील.
पण असं काही होणार नाही. हे सरकार 5 वर्षे टिकेल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

राज्यात उसळलेल्या दंगलीबाबत बोलताना सत्तार म्हणाले, दंगल (Riot) घडवणारे जे कोण अपराधी असतील ते रझा अकादमीचे असो की भाजपच्या पुरस्कृत काही संघटना असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

Web Title : ST Workers Strike | bjp mla gopichand padalkar sadabhau khot st workers strike shivsena minister abdul sattar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा, 1 वर्षात 5 लाखाचे झाले 19 लाख, तुमच्याकडे आहे का?

Karishma Tanna | अभिनेत्रीनं चक्क कॅमेर्‍या समोरच उघडली पॅन्टची चेन, फोटो झाले व्हायरल

Pune Corporation | जैन इरिगेशन कंपनी ठरली महापालिकेला वरचढ ! रद्द केलेले चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्याचा निर्णय