ST Workers Strike Called Off | अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, 54 दिवसांनी निघाला ‘तोडगा’; महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike Called Off) अखेर मिटला आहे. मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) झालेल्या आजच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचारी संघटनेनं संप मागे (ST Workers Strike Called Off) घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर (Ajay Gujar), सरचिटणीस शेषराव ढोणे (Sheshrao Dhone) संयुक्त पत्रकार परिषद घेत संप मागे घेतल्याची घोषणा केली.
अजय गुजर म्हणाले, 21 ऑक्टोबर 2021 नुसार 4 नोव्हेंबर पासून पुकारलेल्या संपाला (ST Workers Strike Called Off) आज 45 दिवस झाले आहेत. गेल्या 45 दिवसांत संप शांततेत पार पडला. दरम्यान, परिवहन मंत्र्यांसोबत आमच्या दोन-तीन वेळेस चर्चा झाल्या. त्यानंतर काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. त्यांनी विलीनिकरणाबाबत जो निर्णय होईल तो मान्य करण्याचं ठरवलं. राज्य शासनामध्ये विलीनिकरणावर (merger) आम्ही ठाम आहोत.
विलिनीकरणाचा निर्णय आता कोर्टात प्रलंबित असल्यानं आणि कोर्टानं यासाठी 12 आठवड्यांचा
अवधी दिल्यानंतर 20 जानेवारी पर्यंतचा हा काळ आहे. त्यातच आज हायकोर्टात समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाला.
यावर दिवसभर आमच्या चर्चा झाल्या यामध्ये कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल.
संप काळात निलंबन (Suspension) झालेल्या कर्मचाऱ्यांवरील (MSRTC) कारवाया रद्द करुन
त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचं लेखी आश्वासन अनिल परब यांनी दिलं आहे.
तसेच इतर मागण्याची चर्चेतून सोडवण्यात येतील असंही आम्हाला लेखी आश्वासन देण्यात आलं आहे.
Web Title :- ST Workers Strike Called Off | st strike msrtc workers strike finally called off settle after 54 days marathi news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Chandrakant Patil | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी यादी पूर्ण’ – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)
- Hamsa Nandini Breast Cancer | अभिनेत्री हमसा नंदिनीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, बोल्ड लुकमध्ये फोटो शेअर करून दिला जबरदस्त संदेश…
- Sanjay Raut | गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याचं संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले – ‘हा तर हेमा मालिनी यांचा सन्मान’