ST Workers Strike | तणावात असलेला लातूरच्या निलंगा डेपोतील एसटी कर्मचारी घरात कोसळला, उपचारादरम्यान झाला मृत्यू

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलिनिकरण करावे यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) गेले आहेत. संप मिटत नसल्याने अनेक कर्मचारी तणावात आले आहेत. आंदोलनामुळे (ST Workers Strike) मानसिक तणावात असलेल्या लातूर जिल्ह्यातील (Latur district) देवणी येथील एसटी कर्मचारी दहा दिवसांपूर्वी घरात कोसळून (collapsed due stress) पडला. त्यामुळे त्याच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू (Death) झाला.

 

शिवकुमार भानुदास शिरापुरे Shivkumar Bhanudas Shirapure (वय-38 रा. देवणी) असे मयत एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिवकुमार शिरापुरे हे निलंगा येथील बस आगारात (Nilanga bus depot) यांत्रिकी विभागात कार्यरत होते. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने ते चिंताग्रस्त होते. संभाव्य आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावात होते.

 

दरम्यान 10 दिवसांपूर्वी घरात अचानक कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागल्याने
त्यांना तातडीने लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार सरु असताना शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
त्यांच्यावर देवणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Web Title :- ST Workers Strike | death latur nilanga depot st employee who collapsed due stress ST Workers Strike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा