ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून संप (ST Workers Strike) सुरु केला आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ (Salary Increase) करुन कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले होते. मात्र, संपकरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन काही जणांना बतडर्फ केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Workers Strike) सामान्य नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

 

दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा (Mesma Act) लावण्याबाबत आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. सरकारने शक्यतेपेक्षा जास्त पगारवाढ दिली आहे. पण काही कामगार भरकटलेले आणि दिशाहीन झाले आहेत. कामगारांमध्ये अफवांचं पीक आल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे. आजच्या बैठकीत मेस्मा कुणावर आणि कसा लावायचा याचा निर्णय घेतला जाईल असे परब यांनी सांगितले.

22 हजार कर्मचारी हजर
आतापर्यंत 22 हजार कर्मचारी कामावर हजर झाल्याचे सांगत अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) मागे घेऊन कामावर हजर राहण्याचे पुन्हा आवाहन केले. कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) एसटी वाहतूक बऱ्यापैकी सुरु झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र वाहतूक कमी असल्याचे परब यांनी सांगितले. कामावर न परतलेल्या आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन (Suspension) झालं आहे, तर अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

 

विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात असून न्यायालयाने नेमलेली समिती अहवाल देणार आहे.
पण 20 डिसेंबरला एसटीचं विलीनकरण होईल असे सांगितले जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र यात कर्मचाऱ्यांचेच नुकसान होत आहे, असं परब यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | maharashtra st bus strike will mesma be imposed on MSRTC employees anil parab

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Conjunctivitis Babies Eyes | ‘या’ 5 कारणांमुळे लहान मुलांचे डोळे होऊ शकतात लाल, घरगुती उपायांनी ठिक करा

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!

 

Sushant Singh Rajput Sister | सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने शेअर केला बोल्ड फोटो तर सुशांतचे चाहते संतापले

Ramesh Kumar | ‘जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा’, ‘या’ आमदाराचं धक्कादायक वक्तव्य