ST Workers Strike | एसटी कामगारांच्या संपात फूट?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील तीन दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (ST Workers Strike) 100 टक्के एसटी बसेस बंद होत्या. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेल्या आवाहनानंतर 2 हजार कामगार डेपोत परतल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी परतल्याने आज (शुक्रवार) 17 डेपोमधून बसेस सोडण्यात (busses started) आल्या. या बसमधून 800 पेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Managing Director Shekhar Channe) यांनी दिली. तसेच आझाद मैदान येथे सुरु असलेल्या संपात देखील कर्मचाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून आले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात (ST Workers Strike) फूट पडल्याचे पहायला मिळत आहे.

 

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे सरकारने खासगी वाहनांना (private vehicle) प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली. राज्यातील विविध स्टँडवरुन खासगी बस गाड्या सोडण्यात आल्या. तसेच एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. त्यांनाही पोलीस संरक्षण देऊन 2 हजार कर्मचारी आज कामावर रुजू केले आहेत. त्यामुळे आज राज्यभरातील 17 डेपोमधून एकूण 36 बस सोडण्यात आल्याचे शेखर चन्ने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

कोठे किती प्रवासी ?

मुंबई – सातारा 15 प्रवासी, दादर-पुणे 55 प्रवासी, ठाणे-स्वारगेट 16, स्वारगेट-दादर 44, स्वारगेट-ठाणे (शिवनेरी) 78,
स्वारगेट कोल्हापूर-35, स्वारगेट-मिरज 18, पुणे स्टेशन-दादर 168, पुणे-नाशिक 65, नाशिक-पुणे 126, नाशिक-धुळे 50,
राजापूर-बुरुंबेवाडी22, अक्कलकोट-सोलापूर -37, इस्लामपूर-वाटेगाव 27, सांगली-पुणे 32 असे एकूण 36 बसेसमधून 826 प्रवाशांनी प्रवास केला.

 

Web Title :- maharashtra st workers strike busses started running road

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा