ST Workers Strike | कारवाईला अधिक वेग ! आणखी 174 संपकरी ST कामगारांचे निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवरुन गेली दोन महिने एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. एकीकडे एसटी कामगार विलीनीकरणावर ठाम आहेत. तर दुसरीकडे शासनाने कठोर पाऊले उचलण्याची तयारी दर्शवली आहे. या आगोदर अनेक संपकरी कामगारांना निलंबित (Suspended) करण्यात आलं होतं. त्यातच आज (सोमवारी) एकूण 174 संपकरी एसटी कामगारांचं निलंबन करण्यात आले आहे. (Suspension of 174 MSRTC workers)
याआधी म्हणजे शुक्रवारी 182 संपकरी एसटी कामगारांचं (ST Workers) निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आणखी कारवाईला वेग आल्याचे समोर दिसत आहे. दरम्यान आज अधिवेशनादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ती मागे घेतली जाणार नाही,’ असं परब म्हणाले आहेत.
दरम्यान, शुक्रवारपर्यंत एकूण 241 संपकरी एसटी कामगारांचं (ST Workers Strike) निलंबन करण्यात आलं होत. त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे ही कारवाई थांबली होती. आता पुन्हा या कारवाईला वेग आल्याचे दिसत आहे. यामुळे आज पुन्हा 174 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती समोर आलीय.
Web Title :- ST Workers Strike | MSRTC employee strike and action taken against them
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
BJP MLA Nitesh Rane | शिवसैनिकावर हल्ला प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत वाढ; उद्या न्यायालयात सुनावणी