ST Workers Strike | ‘विलीनीकरण मागणी अमान्य, तातडीने कामावर रुजू व्हा’; उच्च न्यायालयाकडून ST कामगारांना समज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील काही महिन्यापासून एसटी कामगारांचा राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरु आहे. मात्र एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनात विलीनीकरण (Merger) होणार नसल्याचं यापुर्वी राज्य शासनाने (Maharashtra State Government) जाहीर केलं आहे. याबाबत आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे (MSRTC Merger With Maharashtra State Government Not Possible) . ‘तुमची विलीनीकरणाची मागणी अमान्य झालीय, तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या. संपकरी कामगारांनी (ST Employees Strike) तातडीनं कामावर रुजू व्हावे’ अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एसटी कामगारांना समज दिला आहे. त्याचबरोबर कामगारांना कामावरुन काढू नका, असं स्पष्ट निर्देश देखील राज्य शासनाला दिले आहे.

 

न्यायालय (Bombay High Court) म्हणाले की, समितीच्या शिफारशीनुसार विलीनीकरणास राज्य सरकारचा नकार आहे.
महामंडळाकडून अवमान याचिका मागे घेण्याची तयारी दाखवली आहे.
तुमची विलीनीकरणाची मागणी अमान्य झाली आहे.
महामंडळाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे,
पुढील 4 वर्ष महामंडळ चालवलं जाईल त्यानंतर आर्थिक निकषांच्या आधारावर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल. (ST Workers Strike)

तसेच, ‘तुमच्या समस्या सर्वांनी शांतपणे ऐकल्या, कामगारांना कामावरून काढू नका, सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती.
कामावरून काढून टाकत त्यांच्या जगण्याच साधन काढून घेऊ नका.
आम्ही कधीही तुमच्यावर कारवाईचे आदेश दिलेले नाहीत, असं उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
तर, आंदोलनादरम्यान हिंसा आणि कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांना रूजू करून घेऊ याबाबत ग्वाही देऊ शकत नाही, याबाबत लगेच निर्णय घेऊ शकत नाही,
असं राज्य सरकारकडून युक्तीवाद केला.
तसेच, हिंसा अथवा गैरवर्तन केलेल्या कामगारांना परत सेवेत घ्यायचे की नाही याबाबत महामंडळाचे वकील उद्या (गुरुवारी) कोर्टात माहिती देणार आहे.

 

Web Title :-  ST Workers Strike | MSRTC merger demand invalid return to work immediately bombay mumbai high court warns st employees

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा