ST Workers Strike | मोठा निर्णय ! ST पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी एसटी महामंडळात मेगाभरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. अनेक घडामोडीनंतर काही एसटी कामगार (MSRTC Worker) कामावर दाखल झाले. मात्र काही कामगार अजुनही संपावर ठाम आहेत. दरम्यान आजच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कामगारांना इशारा दिला आहे. तसेच परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनीही कामगारांना इशारा दिला. दरम्यान, आता एक मोठी माहिती मिळत आहे. एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लवकरच एसटी महामंडळात (MSRTC) मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

एका वृत्तवाहिनीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर (ST Workers Strike) उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार असल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर एसटीने हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात गाड्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे बारा हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत. बेस्ट आणि पीएमपीएलच्या धर्तीवर एसटी महामंडळात निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. (ST Workers Strike)

दरम्यान, ”एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा आज संपत आहे. आज जे कर्मचारी हजर झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. त्याचबरोबर11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचं,” अनिल परब म्हणाले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | MSRTC st strike mega recruitment in st corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Keshav Upadhye | केशव उपाध्येंचा काँग्रेस-शिवसेनेला टोला; म्हणाले – ‘महाविकास आघाडीत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे…’

 

Malaika Arora Bralette Photo | नियॉन कलरची ब्रा घालून रस्तावर फिरताना दिसली मलाइका अरोरा, फोटो झाले व्हायरल

 

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत येरवडा येथील मुळीक कॉम्प्लेक्स मध्ये वाहनांची तोडफोड, तरुणावर वार; 4 जणांवर FIR