ताज्या बातम्यामुंबई

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, विलीनीकरणाबाबत मोठी माहिती आली समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नेमलेल्या समितीने (Committee) विलिनीकरणाबाबत अहवाल (Merger Report) सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत तोंडी मागितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन (ST Workers Strike) सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार सरकारने अहवाल देण्यासाठी न्यायालयाने मुख्य सचिवांसह (Chief Secretary) त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती (Three Member Committee) केली होती. या समितीला अहवाल तयार करुन त्यावर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय (CM Opinion) घेऊन तो न्यायालयात दाखल करावा, अशा सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यासाठी 12 आठवड्यांची मुदत समितीला देण्यात आली होती. ती मुदत 3 फेब्रुवारी रोजी संपली आहे.

 

अंतिम अहवाल अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे अहवाल तयार करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत सरकारकडून मागण्यात आल्याची माहिती एसटीमधील सुत्रांकडून मिळत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी एसटी महामंडळाशी संपर्क साधला असता, याबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसून सरकारशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले.

80 जणांची आत्महत्या
मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पगार नसल्याने आर्थिक तंगीला कंटाळून 80 जणांनी आत्महत्या केली. यामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे, असा दावा एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या 65 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. गेल्या तीन महिन्यांत 11 हजार 24 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई (Suspension Action) करण्यात आली असून, 8 हजार 629 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

 

समिती सरकारची आहे…
कोरोना पूर्वी (Corona) एसटीच्या जवळपास एक लाख फेऱ्यांमध्ये 60 लाखांहून अधिक प्रवाशांची रोज वाहतूक होत होती.
कोरोनासंसर्ग ओसल्यानंतर गाड्या सुरु झाल्या, मात्र संपामुळे वाहतूक ठप्प झाली.
सध्या 8 हजार गाड्या सुरु केल्याचा महामंडळाचा दावा आहे.
न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीची मुदत संपून शनिवारी सलग तिसरा दिवस उजाडला.
समिती सरकारची आहे, त्यामुळे त्यांना विचारणे योग्य ठरेल, अशी भूमिका महामंडळाने घेतली.

 

Web Title :- ST Workers Strike | msrtc strike committee wants 2 week extra time to submit report to highcourt on msrtc merger

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली, गेल्या 24 तासात 25,175 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

व्यवसाय सुरू करण्यासाठी PMEGP योजनेंतर्गत मोदी सरकार देतंय सबसिडीसह 25 लाखापर्यंतचे कर्ज, असा करा अर्ज

 

Home Remedies For Periodontal Disease | हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळेल आराम; जाणून घ्या

Back to top button