ST Workers Strike | 6 हजार ST कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार ? कामावर हजर न झाल्यानं महामंडळ (MSRTC) आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा राज्यव्यापी संप (ST Workers Strike) सुरू आहे. तेव्हापासून अनेक घडामोडी घडल्या. अखेर मुंबई हाय कोर्टाकडून (Mumbai High Court) कामगारांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे अशा सूचना देण्यात आल्या. त्यानंतर बहुतांश एसटी कामगार (MSRTC Workers) कामावर हजर झाले असले तरी उर्वरित 6000 एसटी कामगार कामावर हजर झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने (MSRTC) आक्रमक भूमिका घेतली आहे. या संबधित कामगारांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बडतर्फ कर्मचाऱ्यांची विभाग नियंत्रक समक्ष सुनावणी झाल्यावर त्यांना आगार प्रमुखाकडे हजेरी लावावी लागते. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. बराच काळ स्टिअरिंग पासून दूर राहिल्याने त्यांना ‘रिफ्रेशमेंट ट्रेनिंग’ (Refreshment Training) दिले जाते. त्यानंतर त्यांना सेवेत रुजू केले जाते. एसटी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत अपील सुनावणी सुरू असते. यामुळे 10 मेपर्यंत तंतोतंत हजर कर्मचारी आणि कारवाई झालेले कर्मचारी यांची माहिती उपलब्ध होईल. असे म्हटले आहे. (ST Workers Strike)

महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार (MSRTC Chief PRO Rajan Shelar) यांनी सांगितले की,
”बडतर्फ कर्मचाऱ्यांनी 3 आठवड्यांच्या आत अपील करून त्यावर 4 आठवड्यामध्ये महामंडळाने निर्णय घ्यावा, अशा सूचना हाय कोर्टाने दिल्या.
त्यानुसार 11 हजार बडतर्फ कर्मचाऱ्यांपैकी 9 हजार 577 कर्मचाऱ्यांनी अपील दाखल केले.
यापैकी 4 हजार 701 कर्मचाऱ्यांचे अपील निकालात काढण्यात आले असून त्यांना कामावर घेण्याची प्रकिया सुरू केलीय.
उर्वरित कर्मचाऱ्यांचे अपील निकालात काढण्याची प्रक्रिया सुरूय. मात्र अपील न केलेल्या आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- ST Workers Strike | msrtc strike six thousand employees not return on jobs may be msrtc taking strong action

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा