ST Workers Strike | ‘अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात’ – मनसेचा हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  ST Workers Strike | एसटी महामंडळाचे सरकारी सेवेत विलिनीकरण करण्याच्या मागणीवरुन एसटी कामगारांनी राज्यव्यापी संप (ST Workers Strike) पुकारला आहे. त्यामुळे राज्यभरात लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनावरून राजकीय वर्तुळात देखील चर्चा होताना दिसत आहे. यावरून आरोपांचे सत्र सुरूच आहे. भाजपने देखील एसटी कामगारांच्या संपाला पाठींबा दिला आहे. नुकतंच भाजपचे आमदार नितेश राणेंनी (MLA Nitesh Rane) एसटी कर्मचाऱ्यांसोबत आंदोलनात उतरत राज्य सरकारला (Maharashtra Government) लक्ष केलं आहे. यानंतर आता मनसेनेही (MNS) उडी घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आझाद मैदानात जावून एसटी कामगारांच्या आंदोलनाला
(ST Workers Strike) पाठींबा दर्शविला. यांच्यासह मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी देखील एसटी कामगारांच्या संपात सहभाग घेतला.
त्यावेळी खासगी वाहतुकीला परवानगी दिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
जगातील कुठलंही सार्वजनिक ट्रान्सपोर्ट फायदात नाही, आणि ते फायद्यात नसतं.
त्यामुळेच, त्याच्यावर होणाऱ्या खर्चाची, तोट्याची तरतूद करण्यासाठीच तुम्हाला ठेवलेलं असतं.
असं म्हणत संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (CM Uddhav Thackeray) एक व्हिडिओ मी पाहिला.
त्यामध्ये, मुख्यमंत्री नसताना ते म्हणत होते की, आमचं सरकार आल्यानंतर आमचा मंत्री मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरुन खाली येईल.
आंदोलनकर्त्यांजवळ जाईल आणि मोर्चातील माता-भगिनींच्या प्रश्नांची विचारपूस करेन. पण, तुम्ही मंत्रालयातून खाली आला नाहीत.
तुमचा मंत्रीही 6 व्या मजल्यावरुन खाली उतरला नाही.
अनिल परब तुम्ही 6 व्या मजल्यावरुन खाली उतरला नाहीत, पण महाराष्ट्राच्या मनातून उतरलात.
राज्यातील एसटी कर्मचारी (ST Workers Strike) आणि राज्यातील जनतेच्या मनातून उतरलात. अशी जोरदार टीका त्यावेळी करण्यात आलीय.

 

Web Title : ST Workers Strike | MSRTC Workers strike anil parab you came down heart maharashtra mns sandeep deshpande shiv sena st worker strike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीची येरवडा कारागृहात रवानगी; पत्नी डिंपल सोमजीच्या जामीनावर सोमवारी सुनावणी

LPG Cylinder | जर गॅस सिलेंडरने घडली असेल दुर्घटना तर मिळेल 50 लाख रुपयांची भरपाई, जाणून घ्या कशी?

High Court | ‘पूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी घेतलेली संमती भविष्यातही लागू होणार नाही’ – हाय कोर्ट