ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, निलंबनाचा धक्का बसलेल्या एसटी चालकाने उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मागील महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) सुरु आहे. त्यावर राज्य सरकार (State Government) तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ (Salary increase) केली. परंतु विलिनीकरणाच्या (Merger) मागणीसाठी काही कर्मचारी अद्यापही संपावर (ST Workers Strike) ठाम असल्याने एसटी महामंडळाने त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एसटी संपात सहभागी झाल्यामुळे निलंबित (Suspend) करण्यात आलेल्या एका बस चालकाने नैराश्येतून विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (attempt suicide) केला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर आगारात (Raver Depot) आज (गुरुवार) दुपारी घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

राहुल विश्वनाथ कोळी Rahul Vishwanath Koli (वय-35) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाचे नाव आहे. कोळी हे जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवासी असून आज त्यांना एसटी महामंडळाकडून (ST Corporation) निलंबित केल्याचे पत्र आलं होतं. त्यामुळे कोळी नैराश्येत होते. आज दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास एसटी डेपोमध्ये असतानाच त्यांनी विषारी औषध प्राशन केले. औषध घेताच ते खाली कोसळले. त्यांना डेपोत उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.एस. चव्हाण (Medical Officer Dr. N.S. Chavan) यांनी तात्काळ उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान, विलिनीकरणाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या (High Court) समितीसमोर आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होईल. तोपर्यंत कामगारांनी (ST Workers Strike) कामावर परतावं, अशी भूमिका सरकारची आहे. मात्र, कर्मचारी कामावर परतत नसल्यानं महामंडळनं निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत राज्यभरात हजारो कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आधीच तणावाखाली असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

 

Web Title :- ST Workers Strike |msrtc workers strike bus driver attempts suicide after suspension at raver depot in jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 54 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त

Urfi Javed| पुन्हा उर्फीच्या हाॅट अदांनी लावलं लोकांना वेड, निळ्या बिकनीत उर्फीचा बोल्ड अंदाज

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई