ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट?, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेच्या अजय गुजर यांच्या माघार घेण्याने संपकरी आक्रमक

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर अनिल परब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe), महाव्यवस्थापक माधव काळे (Madhav Kale) आणि अध्यक्ष अजय गुजर हे उपस्थित होते. दरम्यान, सहा तास चाललेल्या बैठकीनंतर परब यांनी दिलेल्या माहितीत, चर्चेतून प्रश्न सुटतील असं सांगत संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी त्यांच्याकडून संप (ST Workers Strike) मागे घेतल्याचे जाहीर केले. शिवाय विलनीकरणाच्या मुद्यावर आम्ही ठाम असून यासंदर्भात सरकार सोबत चर्चा करणार असल्याचे गजुर यांनी म्हटले.
गुजर यांनी संप मागे घेण्याचे जाहीर केल्यानंतर आझाद मैदानात (Azad Maidan) उपस्थित अनेक संपकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विलनणीकरणाच्या मुद्याशिवाय संप मागे घेणार नाही. या एकमेव मागणीवर ठाम असल्याचं अनेकांनी सांगितले. तसच एका संतप्त महिला आंदोलकाने एक लाख संपकऱ्यांचा जीव गेला तरी आम्ही दुखवटा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले.
एकीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे.
तर दुसरीकडे अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) हे आंदोलनावर ठाम आहेत.
विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची भूमीका सदावर्ते यांनी घेतली आहे.
अन्यथा आम्ही दुसरा वकील बघू-गुजर
अजय गुजर म्हणाले, आम्ही विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहोत. पण समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.
सदावर्ते हे आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल,
त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही दुसरा वकील (Lawyer) बघू, असे सांगितले.
दरम्यान यापूर्वी कोर्टात सुनावणीदरम्यान अजय गुजर यांची किमान वेतन श्रेणी एसटी कामगार संघटना नोंदणीकृत आहे मात्र मान्यताप्राप्त नाही,
शिवाय याचे केवळ दोन सदस्य आहेत, अशी माहिती सदावर्ते यांनी कोर्टात दिली.
Web Title :- ST Workers Strike | MSRTC workers strike leader ajay gujar withdrawal himself from st strike azad maidan strike st workers became aggressive
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update