ST Workers Strike | एसटी महामंडळाकडून कारवाई सुरू ! संप करणाऱ्या ST कामगारांची नोकरी जाणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST workers strike | मागील काही दिवसांपासून महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे यासाठी एसटी कामगारांनी (ST workers strike) राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. आजही राज्यातील लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे महामंडळाला कोट्यावधीचा फटका बसला. तर दुसरीकडे प्रवाशांना अधिक हाल सोसावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने खासगी गाड्यांना प्रवासास परवानगी दिलीय. दरम्यान त्यातच आता एसटी महामंडळाकडून (MSRTC) कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तर अनेक कर्मचा-यावर कारवाईही केलीय. आता निलंबनानंतर (Suspended) आता कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याची माहिती समोर आलीय.

 

राज्य सरकारच्या (Maharashtra Government) सुचनेनंतर आणि उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) सुचनेनंतर देखील एसटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संप सुरूच ठेवला आहे. जोपर्यत एसटी महामंडळाचे (MSRTC) राज्य शासनात विलिनीकरण यावर तोडगा काढत नाही तोवर संप सुरूच राहणार असल्याचं कामगारांनी स्पष्ट केलं आहे. या संपामुळे प्रवाशांची ताराबंळ उडाली आहे. दरम्यान महामंडळाने काल संप करणा-या एसटी कर्मचा-यांना (ST Workers Strike) निलंबित केलं आहे. तसेच आता आणखी मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानूसार महामंडळ कडक पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, संप दडपण्यासाठी प्रशासनाची कारवाई जारीच असल्याचं दिसत आहे.
उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सुमारे 343 संप करणा-या
कर्मचार्‍यांच्या विरोधात अवमान याचिका (Contempt petition) महामंडळाने आज दाखल केली आहे.
यावर संबंधितांना येत्या शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हाय कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, येत्या 15 नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | protesting st workers will lose their jobs action taken by msrtc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा